Posts

Showing posts from January, 2023

यशात नाहीतर अपयशात Marathi Poem Suhas Sajgure

  यशात नाहीतर अपयशात शेवटी असावा विश्वास स्वप्नपूर्तीच्या कार्यासाठी कारणी लावावा शेवटचा श्वास काय यश आणी काय अपयश हे गुड अकलनिय नसते समाधानाच्या व्याख्येतच त्याचे उत्तर अपेक्षित असते किती केला विचार तरीही नाही सुचले काय कराव काय नाही यातच मन खचले दुरवरच्या आकाशात नजर टाकली तेव्हा तेजोमय असं काही भासले काळोख माझ्या भोवतालचा सारुनी थोडासा जेव्हा निळा नभात मी स्वप्न सजविले चालता चालता थोडे थकल्यासारखे वाटले पुढचे पाऊल उचलतांना अंगातील बळ एकवटले सारे गुन्हे पोटात घालुनी फिरवली जावी अपयशाची वाट विजयाच्‍या शिखरावर जिने न्यावं तीच आहे यशाची वाट